JAA बद्दल

जन आरोग्य अभियान, महाराष्ट्

भारतातील आरोग्यावर काम करणाऱ्या शेकडो संस्था, स्त्री संघटना, कष्टकऱ्यांच्या संघटना,  विज्ञान संघटना, आरोग्य हक्क कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन 2000 साली ‘जन स्वास्थ्य अभियान’ची स्थापना केली. राष्ट्रीय पातळीवरील विविध 20 नेटवर्क यांनी  एकत्रित येऊन  ‘जन स्वास्थ्य अभियान’ची राष्ट्रीय सुसूत्रीकरण समिती बनवली आहे. भारतातील सुमारे 500 संस्था-संघटना ‘जन स्वास्थ्य अभियाना’चा भाग आहेत. 

या राष्ट्रीय आघाडीचा भाग म्हणून, महाराष्ट्रात जन आरोग्य अभियान 2000 सालापासून कार्यरत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 60 ते 70 संस्था व संघटना सहभागी झालेल्या आहेत. लोकांच्या आरोग्य हक्कांसाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी, लोकाभिमुख आरोग्य धोरणांसाठी जन आरोग्य अभियान काम करत आहे. रुग्ण हक्कांच्या संरक्षणासाठी, शासनामार्फत खाजगी हॉस्पिटलचे योग्य ते नियमन व्हावे, अशी जन आरोग्य अभियानाची भूमिका आहे.

महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, पुरोगामी संघटना – संस्था, सजग नागरिक यांनी या जन आरोग्य अभिानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत.   

ई-मेल: janarogyaabhiyan@gmail.com

www.facebook.com/janarogya 

Scroll to Top