अमरावतीमध्ये आरोग्य हक्क परिसंवादास उत्साही प्रतिसाद

अमरावती, 2 डिसेंबर 2023 :

जन आरोग्य अभियानाच्या राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहिमेंतर्गत शनिवार, दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी अमरावती येथे आरोग्य हक्क परिसंवाद पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांच्या 53 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. 

या परिसंवादात सुरुवातीला प्रास्तविकामध्ये जन आरोग्य अभियान, सद्या सुरू असलेली राज्यव्यापी मोहीम, नांदेड सत्यशोधन अहवाल याबाबत डॉ. अभय शुक्ला व दीपक जाधव यांनी माहिती दिली. त्यानंतर सोमेश्वर भाऊ यांनी अमरावती जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांच्या सद्यस्थितीबाबत मांडणी केली. चांदुर रेल्वे, चिखलदरा,धारणी आदी विविध तालुक्यातून आलेल्या लोकांनी त्यांचे सरकारी सेवेबाबतचे अनुभव मांडले. पुढच्या सत्रात खाजगी रुग्णालयात दरपत्रक, रुग्णहक्क सनद लावणे, तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करणे याबाबत चर्चा करण्यात आली.

 शेवटी सर्व सहभागी यांनी मिळून कृती कार्यक्रम ठरवला. जन आरोग्य अभियान, नांदेड या नावाने 17 जणांची जिल्हास्तरीय समिती यावेळी तयार करण्यात आली. या समितीमधील सदस्यांनी सरकारी रुग्णालयांचा डाटा गोळा करणे, खाजगी हॉस्पिटलकडून नियमांचे पालन व्हावे यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देणे, तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे आदी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. त्याचबरोबर तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करून जिल्ह्याचा आरोग्य जाहीरनामा तयार करण्याचा ही निर्णय यावेळी घेण्यात आला.  डॉ. मधुकर गुंबळे व त्यांच्या टीमने परिसंवादाचे आयोजन केले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top