सोलापूरमध्ये आरोग्य हक्क संवाद सभा

सोलापूर : जन आरोग्य अभियानाच्यावतीने निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे बुधवार, 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य हक्क संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे.

जन आरोग्य अभियानाच्यावतीने राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सरकारी आरोग्य सेवांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली जात आहे. त्याचबरोबर रुग्णहक्क, खाजगी हॉस्पिटलवर सरकारी नियंत्रण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत. तरी या परिषदेला सामाजिक कार्यकार्ये रवींद्र मोकाशी, डॉ. अभय शुक्ला उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top