कोल्हापूर, दि. 2 जानेवारी 2024
कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 42 लाखांवर पोहचली असताना ही अद्याप इथे जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले नाही हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे. त्याचे गंभीर परिणाम कोल्हापूरच्या आरोग्य सेवेवर होत असल्याचे मत जन स्वास्थ अभियानाचे सह संयोजन डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले.

जन आरोग्य अभियानाच्यावतीने राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवार, दि. 2 जानेवारी 2024 रोजी राजर्षी शाहू स्मारक येथे जिल्हा आरोग्य हक्क परिषद पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत यादव, सुरेश शिपूरकर, शिवाजीराव परुळेकर, भरमा कांबळे, रवी देसाई, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे स्वप्नील गोसावी, दीपक देवलापुरकर, नेताजी पाटील, आशा संघटनेच्या उज्वला पाटील, उपस्थित होते. यावेळी पुढील कृती कार्यक्रम राबवण्यासाठी जन आरोग्य अभियानाची कोल्हापूर जिल्हा समिती तयार करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

डॉ. अभय शुक्ला यांनी जन अभियानामार्फत सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी आरोग्य मोहिमेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका दिवसात 24 मृत्यू झाले. त्यानंतर जन आरोग्य अभियानाने तिथे जाऊन त्या घटनेमागच्या कारणांचा शोध घेऊन सत्यशोधन अहवाल तयार केला. त्यावेळी या घटनेला केवळ एक व्यक्ती नाही तर सर्व आरोग्य व्यवस्था जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र सरकार आरोग्यावर खूपच कमी खर्च करत आहे. देशात आरोग्यावरील खर्चात महाराष्ट्राचा शेवटचा नंबर आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधांची कमतरता आहे, मनुष्यबळ नाही. यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहीम सुरू करण्यात आली आहे.”

यावेळी उपस्थितांनी सरकारी हॉस्पिटलबाबतचे अनुभव मांडले. या परिषदेला जन स्वास्थ अभियानाचे सह संयोजन डॉ. अभय शुक्ला, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत यादव, शिवाजीराव परुळेकर, चंद्रकांत सुर्यवंशी, भरमा कांबळे, रवी देसाई, उज्वला पाटील, पंडित कंदले, विनायक यादव, सुवर्णा तळेकर, रवी जावळे, प्रविण , रामकृष्ण पाटील, उदय लाड, शरद आजगेकर, उदयसिंह इंदुलकर, शरद पाडळकर, आनंदराव चौगुले, जयंत मिठारी, संतोष मदभावे, जगदीश गुरव, शीतल पाटील, लखन ऐवाळे, राजू लाटकर, बबन मोरे, संदीप देसाई, उषा जाधव, दिलीप चौगुले आदी विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलच्या सद्य:स्थितीची मांडणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. चंद्रकांत यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मोहन सातपुते यांनी आभार मानले.
